Earthing System
सुधारीत अर्थिंग काळाची गरज आपण इमारतीमधील अतिशय महत्वाची असलेली वीज यंत्रणा योग्य पद्धतीची आहे की नाही याची साधी चौकशी सुद्धा करत नाही. इमारतीमध्ये केलेले वायरिंग मधील अर्थिंग योग्य प्रकारचे आहे कि नाही ? वायरिंग मध्ये सुरक्षेसाठी योग्य उपकरणे वापरली आहेत का नाहीत ? अर्थिंग कशा प्रकारे केले आहे याचीही माहिती आपण घेणे अतिशय आवश्यक असते. वीज अपघातास अनेक कारणे असतात. जुन्या वायर्स दीर्घकाळ वापरल्याने बाह्य आवरण (इन्शुलेशन) खराब होण्याने देखील वीज गळती होते. वीज उपकरणे अयोग्य पद्धतीने वापरल्याने देखील वीज गळती होऊन शॉक बसतो. आजकाल बरिच उपकरणे धातूची असतात. या धातूच्या उपकरणांमध्ये वीज गळती होते. काही कारणाने वीजप्रवाह गळती (लिकेज) मुळे याउपकरणाच्या धातूच्या बाह्य...