Earthing System
सुधारीत अर्थिंग काळाची गरज
आपण इमारतीमधील अतिशय महत्वाची असलेली वीज
यंत्रणा योग्य पद्धतीची आहे की नाही याची साधी
चौकशी सुद्धा करत नाही. इमारतीमध्ये केलेले वायरिंग मधील अर्थिंग योग्य प्रकारचे आहे कि नाही ?
वायरिंग मध्ये सुरक्षेसाठी योग्य उपकरणे वापरली आहेत का
नाहीत ? अर्थिंग कशा प्रकारे
केले आहे
याचीही माहिती आपण घेणे अतिशय आवश्यक असते.
वीज अपघातास अनेक कारणे असतात. जुन्या वायर्स दीर्घकाळ वापरल्याने बाह्य आवरण (इन्शुलेशन) खराब होण्याने देखील वीज गळती होते.
वीज उपकरणे अयोग्य पद्धतीने वापरल्याने देखील वीज गळती होऊन शॉक बसतो. आजकाल बरिच उपकरणे धातूची असतात. या धातूच्या
उपकरणांमध्ये वीज गळती होते. काही कारणाने
वीजप्रवाह गळती (लिकेज) मुळे याउपकरणाच्या धातूच्या बाह्य
आवरणामध्ये उतरतो. आणि दुर्दैवाने या वीज गळती असलेल्या उपकरणाशी आपला संपर्क आला
कि विजेचा धक्का किंवा शॉक बसतो. वीज उपकरणाचे योग्य प्रकारे अर्थिंग केले असेल तर
आपले विजेच्या धक्क्यापासून संरक्षण होऊ शकते. म्हणून घरगुती,वाणिज्य, औद्योगिक, कृषी पंप, अरोग्य केंद्रातील उपकरणांना अर्थिंग जोडणे
गरजेचे असते. ही अर्थिंग ची जोडणी अतिशय कमी किंवा नगण्य अवरोध (रेझिस्टन्स) असलेल्या तारेने जमिनीशी जोडेलेली असते. जेंव्हा वीज गळती
असलेल्या उपकरणाशी एखाद्या व्यक्तीचा संपर्क होतो, तेंव्हा गळती होणाऱ्या विजेच्या प्रवाहाला जमिनीकडे जाण्यासाठी दोन मार्ग
उपलब्ध असतात. एक मार्ग म्हणजे ज्या व्यक्तीचा उपकरणाशी संपर्क झाला आहे त्या
व्यकितचे शरीर आणि दुसरा मार्ग म्हणजे उपकरणास जोडलेल्या अर्थिंग च्या तारेतुन ; पाणी जसे उताराकडे वाहते, तसे वीज नेहेमी कमी अवरोध (रेझिस्टन्स) असलेल्या
माध्यमातून जमिनीकडे जाते. त्यामुळे उपकरणाला जोडलेली अर्थिंगच्या तारेचा किंवा
जमिनीतील अर्थिंग चा अवरोध (रेझिस्टन्स) उपकरणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ति
पेक्षा जास्त असेल (सोप्या भाषेत अर्थिंग चांगले नसेल) तर अर्थातच वीज कमी अवरोध
असलेल्या व्यक्तीच्या शरीरातून जमिनीत जाईल. यालाच शॉक बसणे असे म्हणतात. याच्याच
उलट अवस्थेत म्हणजे विजेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या शरीराच्या अवरोधापेक्षा
अर्थिंग चा अवरोध कमी असेल (म्हणजेच अर्थिंग चांगले
असेल) तर गाळणारा वीज प्रवाह (लिकेज करंट)व्यक्तीच्या शरीरातून जाण्या ऐवजी
अर्थिंग च्या तारेतून जमिनीकडे जातो आणि व्यक्ती सुरक्षित राहते.
विजेचा धक्का व त्याचे विपरीत परिणाम
बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. जसे विद्युत दाब,विद्युत प्रवाह,
प्रवाह वाहण्याचा
कालावधी, बाधित
व्यक्तीच्या शरीराची अवस्था, शरीराचा अवरोध इत्यादी. वीजप्रवाह १ मिली अँपियर पेक्षा
कमी असेल तर
फारश्या संवेदना जाणवत नाहीत. ५ मिली अँपियर पर्यंत थोडी संवेदना जाणवते. पण ५ ते
२० मिली अँपियर
पर्यंत वीज
प्रवाह शरीरातून वाहिल्यास विजेच्या झटक्याची संवेदना चांगलीच जाणवते. आणि ५० ते २०० मिली अँपियर इतका प्रवाहा मुळे शरीराच्या विशेषतः हृदयाचे स्नायुंचे आकुंचन
होऊन प्रसंगी मृत्यू ओढवतो. त्याच पद्तीने नेहमी वापरणारी उपकरणे उदा. ( घरगुती
उपकरणे, Computer, टीवी, विजेवर चालणारी सर्व
उपकरणे इत्यादी.) जळाल्यामुळे आर्थिक नुकसान होते. मानवी जीवनाला विजेपासून अतिशय
सुरक्षित ठेवणाऱ्या अर्थिंग कडे नेहेमीच
दुर्लक्ष केले जाते.
म्हणुन अर्थिंग बाबत काही मूलभूत आवश्यक माहिती जागरूकपणे समजून घेऊन अर्थिंग
करुन घेणे हे प्रत्येकाने
आपले कर्तव्य मानले
पाहिजे, तरच भविष्यातील
विजेचे अपघात आपल्याला टाळता येतील.त्यासाठी अर्थिंगची गरज पदोपदी
बनलेली आहे.
अर्थिंग करण्यामागील उद्देश :-
१)
माणसाला जगण्यासाठी जशी पाण्याची गरज असते तसेच
विज वापरताना अर्थिंगची गरज असते.
२)
अर्थिंगच्या वापरामुळे मानवहानी व
विजेवर चालणारी उपकरणे, मशीनरी यांचे होणारे नुकसान टाळता येते.
३)
उपकरनाचे आयुमान वाढते
त्यामुळे आर्थिक लाभ होतो.
४)
अर्थिंग असल्यामुळे
भविष्यात होणाऱ्या अपघात आपल्याला वेळीच टाळता येतात. त्यामुळे उत्पादनात वाढ
होते.
५)
अर्थिंगच्या वापरामुळे विजपुरवठा सुरळीत चालतो त्यामुळे विज
बिलात बचत होते.
अर्थिंगचे फायदे :-
1) कमीत कमी किमंत.
2) कमीत कमी जागा लागते.
3) चांगली गुणवत्ता व दिर्घकाळ टिकते.
4) जास्तीत जास्त आयुष्यमान.
5) साध्या अर्थिंग पेक्षा गुणवत्ता चांगली आहे.
6) दुरुस्थी करण्याची गरज नाही.
7) सदर रॉड कॉपर, जिंक, SS स्टील, मध्ये उपलब्ध.
अर्थिंग रॉडचे साईज :-
Model
|
Length
|
Terminal
|
Galvanised/copper Micron
|
||
E-40
|
1.5 Mtr
|
2 Mtr
|
3 Mtr
|
12 MM
|
250-300
|
E-50
|
1.5 Mtr
|
2 Mtr
|
3 Mtr
|
12 MM
|
250-300
|
E-60
|
1.5 Mtr
|
2 Mtr
|
3 Mtr
|
14 MM
|
250-300
|
E-75
|
1.5 Mtr
|
2 Mtr
|
3 Mtr
|
14 MM
|
250-300
|
Mr. Mallappa
Kumbhar
M/s Entire Electricals And Engineers
Sr. No. 426, At-Post Tanang,
Taluka-Miraj Dist-Sangli,
Maharashtra.
Email ID :-
entireelectricals@outlook.com


Very good nice
ReplyDeleteExcellent Work
ReplyDeleteफारच सुंदर सर
ReplyDeleteNice well done job
ReplyDeletePlease Provide Earthing Soil Test method.
ReplyDeleteVery Nice
Goo............d
ReplyDeletebest
ReplyDelete